Ganesh Visarjan Special Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Ganesh Visrajan Special Local: गणेशभक्तांसाठी खुशखबर! मुंबईत गणेश विसर्जनासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार विशेष लोकल

Satish Kengar

>> संजय गडदे

Ganesh Visarjan Special Local Train:

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जना निमित्त मुंबई उपनगरातून अनेक भाविक मुंबईत दाखल होत असतात. प्रवाशांची गर्दी ध्यानात घेता पश्चिम रेल्वेने ८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक जलद गाड्यांना मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत सर्व जलद गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार (28 सप्टेंबर आणि शुक्रवार 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री या विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान या आठ विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

अनंत चतुर्दशी निमित्त विशेष लोकल

चर्चगेट वरून विरार साठी पहिली विशेष लोकल मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल

दुसरी विशेष लोकल विरार येथून चर्चगेट साठी रात्री सव्वा बारा वाजता सुटेल

तिसरी विशेष लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री एक वाजून 55 मिनिटांनी सुटेल

चौथी विशेष लोकल रात्री पावणे एक वाजता विरार स्थानकातून चर्चगेट साठी सुटेल

पाचवी विशेष लोकल मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी चर्चगेट स्थानकातून विरार साठी सुटेल

सहावी विशेष लोकल विरार वरून चर्चगेट साठी रात्री एक वाजून 40 मिनिटांनी सुटेल

सातवी विशेष लोकल पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी चर्चगेट स्थानकातून विरार साठी सुटेल

आठवी विशेष लोकल पहाटे तीन वाजता विरार स्थानकातून चर्चगेट साठी सुटेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT