Mumbai News mother throws 39 day old baby from 14th floor of mulund building Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: माता न तू वैरिणी! नवजात बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकलं; मुंबईतील संतापजनक घटना

सूरज सावंत

Mumbai Latest Crime News

जन्मदात्या आईनेच आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. ही संतापजनक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हशवी संकेत मेहता असे मृत बाळाचे, तर मनाली मेहता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनाली मूळ गुजरातमधील सुरतची रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतील (Mumbai Crime News) मुलंड परिसरात आपल्या आईकडे राहण्यासाठी आली होती.

मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे मनाली तणावात होती. तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दरम्यान, या तणावातून गुरुवारी पहाटेच्या सुमारास मनालीने आपल्या हशवीला इमारतीच्या १४ मजल्यावरून खाली फेकलं. (Latest Marathi News)

या घटनेत हशवीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईनेच आपल्या बाळाला १४ व्या मजल्यावरून फेकल्याचं पोलीस तपासात उघड झालं. यानंतर पोलिसांनी मृत बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे.

सांताक्रुजमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना सांताक्रुजमध्ये घडली. न्यू लोटस बिल्डिंग साईट राजेश खन्ना गार्डन या इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शहाबुद्दीन नजरुल गाजी याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातून आरोपीने हे कृत्य केलं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT