Bandra Accident CCTV Video Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, अपघाताचा थरारक CCTV VIDEO

Bandra Accident CCTV Video: भरधाव रिक्षावरील चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे या रिक्षाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

Priya More

मुंबईमध्ये अपघाताचे (Mumbai Accident) सत्र सुरूच आहे. अशामध्ये वांद्रे येथे भरधाव रिक्षाच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. पोलिस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रेमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. १६ जुलै रोजी दुपारी अपघाताची ही घटना घडली होती. अपघाताची ही घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. भरधाव रिक्षावरील चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे या रिक्षाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ही व्यक्ती गंभीर जखमी झाली होती.

रिक्षा चालकाने अपघातानंतर या जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषीत केले. या अपघातानंतर वांद्रे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, मुंबईतल्या वरळीमध्ये काही दिवसांपूर्वी ऑडी कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर २२ जुलै रोजी मुंलुंडमध्ये भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये दोन्ही रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले होते. यामधील एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातानंतर ऑडी कार चालक फरार झाला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT