Mumbai News : मुंबईच्या वरळीतून मोठं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या वरळी नाका येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वरळी नाका येथील अविघ्न टॉवर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. इमारतीच्या आवारात लिफ्ट कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे .जखमी झालेल्या दोघांना जवळील शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
विक्रोळीतही घडली होती लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना
दरम्यान, मुंबईतील विक्रोळीच्या श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह इमारतीमध्ये पार्किंगची लिफ्ट २३ व्या मजल्यावरून कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
इमारतीच्या पार्किंगच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले होते. घटनास्थळी अग्नीशमन दलाने बचाव कार्य केले. विक्रोळीतील ही 23 मजल्यांची ही इमारत होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.