Gunaratna Sadavarte Saamtv
मुंबई/पुणे

Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: जनआक्रोश मोर्चातून सदावर्तेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले; 'शरद पवारांच्या तोंडाला...'

यावेळी भाजपा नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार केली. तर वकिल गुणरत्न सदावर्तेंनी थेट दाऊदवरच निशाणा साधला.

Gangappa Pujari

Mumbai: लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपा शिंदे गटासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजपा नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार केली. तर वकिल गुणरत्न सदावर्तेंनी थेट दाऊदवरचं निशाणा साधला. (Mumbai News)

मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपा नेते प्रविण दरेकर, चित्रा वाघ, आशिष शेलार, केशव उपाध्ये यांच्यासह गुणरत्न सदावर्तेही उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले सदावर्ते...

"पाकिस्तानच्या निच विचारामधून जे लव जिहाद चालू झालं. त्या लव जिहादला दफण करण्यासाठी मुंबईमधला हिंदू एकवटला आहे, अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंनी हल्लाबोल केला.

शरद पवारांवर केली टीका..

“शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तोंडाला आजार झाला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग ते लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत? हैद्राबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही? या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत, असे म्हणत सदावर्तेंनी शरद पवारांवर टीका केली.

दरम्यान, मुंबईत आयोजित केलेल्या या हिंदू जनआक्रोश मोर्च्यात नारायण राणे, किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या मोर्च्यात लव्ह जिहादविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच धर्मांतरविरोधी कायदा आणावा, अशी मागणीही करण्यात आली. मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

Municipal Elections Voting Live updates : भाजप उमेदवाराने 600 ते 650 बोगस मतदार आणल्याचा अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीचा आरोप

Homemade Lip Oil : लिप बाम विसरा ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा लिप ऑईल

Pomegranate Skin Benefits : डाळिंबाच्या रसाने चेहरा सोन्यासारखा चमकेल, फक्त फॉलो करा 'या' ३ स्टेप्स

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

SCROLL FOR NEXT