Mumbai House Collapse Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai House Collapse News : मुंबईत मुसळधार पावसामुळे घर कोसळलं; दहिसर पूर्वेकडील घटना

Mumbai Rain Update : मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील केतकी पाडा भागातील शिवशक्ती चाळीतील एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News :

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस  (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसासोबतच मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे. मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही.

मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील केतकी पाडा भागातील शिवशक्ती चाळीतील एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दहिसर पूर्वेकडील सिलेंडर गोडाऊन परिसरातील एक चाळीतील घर कोसळून ही दुर्घटना झाली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील केतकी पाडा भागातील शिवशक्ती चाळीत एका दोन मजली घरामध्ये चार जणांची कुटुंब राहत होतं. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भिंत क्रॅक होण्याचा आवाज ऐकू आल्याने कुटुंबातील चारही सदस्य ताबडतोब घराच्या बाहेर पडले.

घरातील सदस्य बाहेर पडताच काही वेळानंतर घर कोसळून दुर्घटना झाली. वेळीच सावधानता राखत घरातील चारही सदस्य बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT