Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: भयंकर! चहासाठी विचारले म्हणून राग अनावर; तरुणाने मित्रालाच संपवले

Latest News: राजू झोपेत असताना आकाशने त्याला चहा पिण्यासंदर्भात विचारणा केली. त्यामुळे संतप्त होत त्याने मित्रालाच संपवलं.

Priya More

सुरज सावंत, मुंबई

Mumbai Crime News: मुंबईमध्ये हत्येच्या (Mumbai Murder Case) दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत तरुणाने आपल्या मित्राची डोक्यामध्ये पेवर ब्लॉक घालून हत्या केली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी (Dadar Police) आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये टोकाला गेलेल्या वादामध्ये पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कैचीने वार करत हत्या केली. याप्रकरणाचा तपास शाहूनगर पोलिसांकडून (Shahunagar Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर पूर्वला एका तरुणाने आपल्या मित्राचीच निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. एका व्यक्तीने रस्त्यावरील पेवर ब्लॉकने मित्राची हत्या केली. आकाश ठाकूर असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजू देवळेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

राजू झोपेत असताना आकाशने त्याला चहा पिण्यासंदर्भात विचारणा केली. त्यामुळे राग अनावर झालेल्या राजूने रस्त्यावरील फेवर ब्लॉक आकाशच्या डोक्यात घातला. या हल्ल्यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी राजूला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, मुंबईतल्या धारावी परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीचे किरकोळ कारणावरुन भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की पतीने पत्नीची हत्या केली. रेणू विश्वकर्मा असे या मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रेणूचे पती राम विश्वकर्मासोबत वाद झाला. या वादामध्ये संतप्त झालेल्या रेणूच्या पतीने तिच्या गळ्याजवळ कैची खूपसली.

पतीने केलेल्या हल्ल्यात रेणू गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहूनगर पोलिसांनी रेणूच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

Sindhudurg : कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान हाणामारी! | VIDEO

Cough Remedies: सतत खोकल्याचा त्रास होत होतोय? 'या' सवयी लगेच सोडा!

SCROLL FOR NEXT