Maratha Reservation Saamtv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी वाकोला परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण; विदेशी तरुणही उतरले मैदानात

Maratha Reservation Protest News: मुंबईच्या सांताक्रुज परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest:

मराठा आरक्षणाचा लढा राज्यात दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या निर्णयासाठी २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याच्या निर्णयानंतरही राज्यात विविध भागात आरक्षणाची लढाई सुरू असून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईच्या सांताक्रुज वाकोला परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या (Mumbai) सांताक्रुज वाकोला परिसरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले. परिसरातील शेकडो मराठा बांधवांनी दिवसभर उपस्थित राहून मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण केले.

या वेळी दोन विदेशी नागरिकांनीही या लाक्षणिक उपोषणात सहभाग दाखवून 'एक मराठा लाख मराठा' च्या घोषणा दिल्या. लंडनवरून आलेले हे दोघेजण वाकोला परिसरात आले असता त्या ठिकाणची घोषणाबाजी पाहून कुतूहलाने त्यांनी आंदोलकांची चौकशी केली.

दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांची त्यांना जाणीव होताच त्यांनीही त्या उपोषणात सहभागी होऊन मराठा बांधवांबरोबर घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या निर्णयासाठी २४ डिसेंबरपर्यंतचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर निर्णय न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT