Mumbai Shooting News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Firing: मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार, सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळील घटना; व्यापारी गंभीर जखमी

Mumbai Shooting News: मुंबईमध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरामध्ये ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली. गोळीबारामध्ये व्यापारी जखमी झाला आहे.

Priya More

गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली. मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात रात्री गोळीबाराचा थरार पाहायला मिळला आहे. सोनं घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यावर दरोडेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयानजीकच्या पी डिमेलो रोडवर एका सोन्याच्या व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या ३ दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार करत त्याच्याकडील सोन्याची बॅग हिसकावून पळ काढला.

गोळीबारामध्ये व्यापाऱ्याच्या पायाला गोळी लागली. या गोळीबारामध्ये अंगडीया नावाचा व्यापारी जखमी झाला असून त्याच्यावर सध्या सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहे.

याप्रकरणी पोलिसांनी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. चोरीच्या उद्देशानेच हा गोळीबार केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT