ED Raids On Bhushan Steel  Saam TV
मुंबई/पुणे

ED Raid: मोठी बातमी! बँक फसवणूक प्रकरणी भुषण स्टीलच्या प्रवर्तकांवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची संप्पती केली जप्त

Satish Kengar

ED Raids On Bhushan Steel :

बँक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भूषण स्टील लिमिxटेडच्या प्रवर्तकांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने 13 ऑक्टोबर रोजी मुंबई, दिल्ली एनसीआर, हरियाणा, कोलकाता, भुवनेश्वरसह 30 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीने ही कारवाई पीएमएलए, 2002 (PMLA 2002) अंतर्गत केली.

छाप्यादरम्यान, अनेक कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, 72 लाख रुपये रोख, 52 लाख रुपये किमतीचे विदेशी चलन/ चेक आणि 3 लक्झरी कार (मर्सिडीज बेंझ) जप्त करण्यात आल्या. ईडीकडून या गाड्यांची किंमत 4 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, एमडी नीरज सिंघल यांच्या जवळच्या विश्वासू व्यक्तीकडून लपवलेले पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, धाडीदरम्यान विविध महत्वाची कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

ईडीने 72 लाख रुपयांची रोकड, 52 लाख रुपयांचे विदेशी चलन किंवा ट्रॅव्हलर्स चेक आणि मर्सिडीज बेंझसह तीन लक्झरी कार जप्त केल्या आहेत. ज्यांची किंमत 4 कोटी रुपये आहे. ईडीने सांगितले की, त्यांनी 13 ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदी अंतर्गत 30 ठिकाणी धाडी टाकल्या.

ईडीने यापूर्वी रायगडमधील कर्दे बुद्रुक गावातील जमीन, हरियाणातील फरिदाबाद येथील भूखंड आणि आसाममधील कामरूप येथील भूखंड जप्त केला होता. ज्याची किंमत 61.38 कोटी रुपये होती. या वर्षी 6 जून रोजी ईडीने बीएसएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सिंगल यांनाही अटक केली होती, जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT