Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena News : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील माजी नगरसेवक शिंदे गटात सामील

संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते.

साम टिव्ही ब्युरो

>> निवृत्ती बाबर

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आपआपल्या पद्धतीने रणनिती आखत आहेत. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांना वरळी विधानसभेत मोठा धक्का बसला आहे.

 शिवसेना माजी नगरसेवक संतोष खरात(Santosh Kharat) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते.

शिवसेनेच्या संतोष खरात यांनी वॉर्ड क्रमांक 195 मध्ये यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक जिंकली होती. भाजपच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभूत करुन त्यांनी नगरसेवकाची माळ गळ्यात घातली होती.

समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे यांच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातील माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकेसाठी आज मतदान, सर्व अपडेट एका क्लिकवर

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

SCROLL FOR NEXT