संजय गडदे
Mumbai News : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात जमीन खचल्यामुळे चाळीतील घरे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन ते तीन लोक अडकल्याची प्राथिक माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेजच्या बाजूला असलेल्या परिसरात सदर घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या विलेपार्ले परिसरात जमीन खचल्यामुळे चाळींच्या भिंती आणि घरे कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास सदर घटना घडली आहे. मिठीबाई महाविद्यालयासमोरील रस्त्यावर 'मेट्रो दोन ब'चे फायलिंगचे काम सूरू होते. त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळील चाळीतील एक मजली अनेक खोल्या कोसळल्या. या दुर्घटनेत दोन ते तीन अडकल्याची माहिती मिळाली होती. मात्र, या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.
विलेपार्ले परिसरातील इंदिरा नगर-२ मधील नाल्यालगत असलेली चाळीतील एकूण ८ घरे कोसळली आहेत. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. या दुर्घटनेला मेट्रोचे काम करणारे जे कुमार आणि कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी,नगरसेवक, आमदार यांच्याकडे देखील यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.