Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईत कार पार्किंगची लिफ्ट कोसळली; घटनेने परिसरात खळबळ

जोगेश्वरी पश्चिमेकडील एका इमारतीची ऑटोमॅटिक कार पार्किंगची लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडील एका इमारतीची ऑटोमॅटिक कार पार्किंगची लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी उशिरा रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने इमारतीत एकच खळबळ उडाली होती. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडून एक धक्कादायक घटना घडली आहे. जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिमेकडील युनिव्हर्सल क्युबिकल कॉम्प्लेक्स या इमारतीतील ऑटोमॅटिक कार पार्किंग ची लिफ्ट कोसळल्याची घटना रात्री घडली आहे.

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लिफ्ट कोसळण्याची घटना घडली आहे.

मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांपासून उंच इमारतीतील लिफ्ट कोसळण्याच्या घटना त्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. फेब्रुवारी महिन्यात देखील याच इमारतीतील नागरिकांना इमारतीत वरच्या मजल्यावर ये-जा करण्यासाठी असणारी लिफ्ट कोसळल्याची घटना घडली होती. अशातच बुधवारी रात्री उशिरा वाहन पार्किंगसाठी असणारी ऑटोमॅटिक कार पार्क लिफ्ट (Lift) कोसळल्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरलं आहे.

या इमारतीचा विकासात याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी आता रहिवासी करू लागले आहे. शिवाय मुंबई महानगरपालिकेने देखील या इमारतीच्या कामाविषयी करावं अशी मागणी आता रहिवासी करू लागले आहेत. वारंवार लिफ्ट कोसळण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मुंबईत वाढत्या लिफ्ट कोसळण्याच्या घटनेमुळे नागरिकांची चिंता वाढू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT