Mumbai Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण? आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News: या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी...

Mumbai News: व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा मुलगा राज सुर्वेवर (Raj Surve) व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राज सुर्वेसह १० जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित व्यावसायिकाने बंदुकीचा धाक दाखवून स्टॅम्प पेपरवर सही घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी तक्रार केल्यास खोट्या मनीलॉंड्रिंग केसमध्ये गोवण्याची धमकीही दिल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हणले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे हे व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्यासोबतचा एक रॅलीमधील व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली होती. व्हिडिओ मॉर्फ असल्याचे शितल म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कानाला बंदूक,२ राऊंड फायर अन् २७ किलो सोनं गायब! जळगावात चित्रपटालाही शोभेल असा बँक दरोडा, असा उघड झाला कट

Maharashtra News Live Update: पाणी गळती विरोधात पुण्यात अनोख आंदोलन

भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, पेट्रोल-डिझेल आणि प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

Maharashtra Politics : सरकार लवकरच कोसळणार, कुणी केला दावा? कारणही सांगितले; पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT