Mumbai Bike Taxi Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bike Taxi : मुंबईकरांचा प्रवास सुसाट, लवकरच बाईक टॅक्सी धावणार; वेळ-खर्च वाचणार

Mumbai News : मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये बाईक टॅक्सी सुरु होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक टॅक्सी सेवांना परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Bike Taxi in Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. परिवहन मंत्रालयाने मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. यावर उपाय म्हणून बाईक टॅक्सीला मंजुरी दिल्याचे म्हटले जात आहे.

परिवहन मंत्रालयाने मुंबईमध्ये बाईक टॅक्सी संबंधित निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांना बाईक टॅक्सी सेवांचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. बाईक टॅक्सीमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल असे म्हटले जात आहे. यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी बाईक टॅक्सी सेवांना जोरदार विरोध केला होता. यासंदर्भात रॅपिडो कंपनीने बाईक टॅक्सी सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती. पण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंपनीला परवानगी दिली नव्हती. यावरुन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच दरम्यान राज्य सरकारने बाइक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्ससाठी धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.

बाईक टॅक्सी नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांच्या श्रेणीत मोडतात. त्यामुळे त्यांना टॅक्सी आणि रिक्षा यांसाठी आवश्यक असलेल्या परवान्यांपासून सूट मिळते, असे म्हणत टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांना बाईक टॅक्सींना विरोध केला होता. जून २०२४ मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने बाईक टॅक्सी सेवांना मंजुरी दिली होती. एप्रिल महिन्यापासून मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरु होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6: ‘टिकिट टू फिनाले’साठी तुफान राडा! सदस्यांमध्ये रंगणार काटे की टक्कर, पाहा व्हिडीओ

डोक्यावर पदर, हातात संविधान..; सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ज्योती वाघमारेंची खासदारकीची शपथ, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना

Summer Dailywear Outfit: उन्हाळ्यात स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी हे 5 आऊटफिट नक्की ट्राय करा

Weekly Horoscope: बजेट सांभाळा, नातेसंबंधांमध्ये अडथळे येण्याची शक्यता; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT