BEST Workers Diwali Bonus Saam Tv
मुंबई/पुणे

BEST Workers Diwali Bonus: बेस्ट कर्मचाऱ्यांची आज दिवाळी, २९ हजारांचा बोनस खात्यात होणार जमा

Diwali Bonus for B.E.S.T Employees: बेस्टच्या २७ हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला २९ हजार रुपयांचा बोनस आज त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे.

Priya More

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस आज मिळणार आहे. तब्बल २७ हजार रुपयांचा बोनस आज बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला होता पण आता तो त्यांना मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपल्याबाबतचे परिपत्रक मुंबई महानगर पालिका प्रशासनाला सोमवारी संध्याकाळी मिळाले. त्यामुळे आता आचारसंहिता संपली असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज बेस्टच्या २७ हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला २९ हजार रुपयांचा बोनस आज त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला होता. मुंबई महानगर पालिकेने आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हणजेच दिवाळीच्या १० दिवस आधी पालिका कर्मचाऱ्यांना २९ हजारांचा बोनस दिला होता. पण बेस्ट कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होती.

बेस्टचे कार्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कधी मिळणार याबाबत वारंवार पाठपुरावा देखील केला होता. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची देखील मदत घेतली होती. बोनससाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. अखेर आचारसंहिता संपल्यानंतर बोनस मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. अखेर आज त्यांना बोनस मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT