Dengue Maleria Spreading In Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईकरांनो सावधान! मलेरियाच्या ५०९ तर डेंग्यूच्या ३७० रुग्णांची नोंद, कशी काळजी घ्यायची?

Dengue Maleria Spreading In Mumbai: पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा आणि कावीळ यासारखे आजार मुंबईकरांना होत आहेत. तर मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया हे आजार होत आहेत.

Priya More

मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढल झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. गेल्या दोन आठवड्यात मुंबईत डेंग्यूचे ३७०, मलेरियाचे ५०९ तर गॅस्ट्रोचे तब्बल ५४५ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्या आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रोगराई पसरली आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा आणि कावीळ यासारखे आजार मुंबईकरांना होत आहेत. तर मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया हे आजार होत आहेत. जुलै महिन्यामध्ये मुंबईत मलेरियाचे ७९७, लेप्टोचे १४१, डेंग्यूचे ५३५, गॅस्ट्रोचे १४१, कावीळचे १४६, स्वाईन फ्लूचे १६१ आणि चिकनगुनियाचे २५ रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात, पावसाळी रोगांपैकी मलेरिया सर्वात प्राणघातक ठरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जुलै महिन्यापर्यंत राज्यात मलेरियाचे एकूण ९०२५ रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी रुग्णसंख्येचे प्रमाणे ३ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षीची आकडेवारीनुसार गडचिरोलीत सर्वाधिक ३७४५, चंद्रपूरमध्ये ३९७, मुंबईत २८५२ आणि नवी मुंबईत ५४६ रुग्ण आढळले आहेत.

देशातील १२ राज्ये मलेरियामुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून डासांच्या विरोधात मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. २५ एप्रिलपासून मोहिम सुरु झाली असून राष्ट्रीय डासजन्य रोग नियंत्रण केंद्राच्या देखरेखीखाली ही मोहिम मार्च २०२७ पर्यंत चालवली जाणार आहे. अशामध्ये पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्या घराचा आसपास परिसर सवच्छ ठेवा, पाणी साचू देऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या, असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT