Mumbai Mankhurd Boy Killed in Lift Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Mankhurd Lift Accident: लिफ्ट अपघातात 10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, सेक्रेटरी, खजिनदारासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Mankhurd Boy Killed in Lift Accident: लिफ्ट अपघातात 10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, सेक्रेटरी, खजिनदारासह 5 जणांवर गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Mankhurd Boy Killed in Lift Accident: मुंबईत एका गृहनिर्माण संस्थेतील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रुद्र बर्‍हाटे असं मृत मुलाचे नाव असून त्यांच्या मृत्यूच्या महिन्याभरातनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी लिफ्ट कंत्राटदार आणि तंत्रज्ञ यांच्यासह गृहनिर्माण सोसायटी समितीचे सचिव, समिती सदस्य आणि खजिनदार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला.

ही घटना मागील महिन्यात ७ जून रोजी घडली होती. या पाच जणांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ''आरोपींच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे पुरावे मिळविण्यासाठी आम्ही चौकशी करत असल्याने एफआयआर नोंदवायला आम्हाला एक महिना लागला ."

याप्रकरणी रुद्रची आई प्रियांका बर्‍हाटे यांनी फिर्याद दिली आहे की, त्या लल्लूभाई कंपाऊंडमधील सुप्रभात हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर पती, चार मुले आणि मेव्हणा प्रशांतसोबत राहत राहत होत्या. रहिवाशांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनेकदा लिफ्टच्या नादुरुस्तीची तक्रार करूनही या प्रकरणी गृहनिर्माण संस्थेने कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

त्यांनी सांगितलं की, ६ जून रोजी त्यांचा मेहुणा कामावरून परतत असताना त्यांना लिफ्ट बंद असल्याचे दिसले. त्यावेळी कोषाध्यक्षांच्या उपस्थितीत एक तंत्रज्ञ लिफ्टची दुरुस्ती करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर प्रशांतने कोषाध्यक्षांना लिफ्ट पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत बंद ठेवा, असे सांगितले. याबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या आहेत की, इमारतीची लिफ्ट अनेकदा बंद पडली होती.

प्रियांका यांनी केलेल्या तक्रारीनुसार, दुसऱ्या दिवशी त्यांनी रुद्रला इमारतीजवळील दुकानातून काहीतरी खरेदी करण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने सातव्या मजल्याजवळ गर्दी जमल्याचे त्याने पाहिले. त्या घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा त्यांना रुद्र जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला. त्यांनी रुद्रला लिफ्टच्या गॅपमधून बाहेर काढल्याचे तेथे उपस्थित लोकांनी सांगितले. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रियांका यांच्या म्हणण्यानुसार, रुद्रने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण तो लिफ्टच्या गॅपमध्ये पडला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. इमारत समितीच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे प्रियंका यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाल्या की, लिफ्टच्या देखभालीचे कंत्राट एप्रिल २०२२ मध्ये देण्यात आले होते. यातच लिफ्ट दुरुस्ती तंत्रज्ञ फक्त ९वी पर्यंत शिकला आहे. तो यापूर्वी मदतनीस म्हणून काम करत होता. काही महिन्यांनी त्यांची तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT