PADU Machine displayed during demonstration ahead of Mumbai Municipal Election vote counting Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिका निवडणुकीत PADU मशिन, आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप, PADU मशीन नेमकं कशासाठी?

Mumbai Civic Elections: मुंबई महापालिका निवडणुकीत मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका नव्या मशीनवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. मतमोजणीसाठी कोणत्या नव्या मशीनचा वापर करण्यात येणार? ही मशीन नेमक्या कोणकोणत्या महापालिकेत वापरली जाणार?

Suprim Maskar

मुंबई महापालिका निवडणुकीत मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे व्हावी यासाठी प्रशासनानं आधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय..आणि याअंतर्गत PADU हे मशिन वापरण्यात येणार आहे..मात्र या PADU मशिनसंर्दभात राजकीय पक्षांना कुठलीच माहिती दिली नसल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी आयोगावर हल्लाबोल केला आहे. तर कॉग्रेसने नव्या यंत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केला जातोय का? असा सवाल उपस्थित केलाय...

काय आहे PADU?

- PADU म्हणजे प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट

- मतमोजणीवेळी EVMच्या कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल मिळवण्यास मदत

- कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाल्यास PADUद्वारे मत पाहता येणार

- PADU कंट्रोल युनिटला जोडल्यास त्यातील मतं थेट कागदावर प्रिंट होणार

- उमेदवारांना तात्काळ लेखी स्वरूपात निकाल पाहता येणार

दुसरीकडे पालिका आयुक्तांनी मात्र हे मशिन म्हणजे केवळ बॅकअप सिस्टीम असल्याचं म्हटलं आहे. तर पराभवासाठी ठाकरेंना कारण हवं, यासाठी अशी विधानं सुरु असल्याची टीका भाजपनं केलीय.. मतदाराला मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीनचा वापर होणार असल्याचं आयोगानं सांगितलयं... मात्र पाडू हे VVPAT सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना कुठलीच पूर्वसुचना न देता...

अचानक पाडू मशीन मतमोजणीच्या कामासाठी वापरण्याचा निर्णय का घेण्यात आला? आधीच व्होट चोरीवरून विरोधकांनी रानं उठवलेलं असताना आयोगानं विरोधी पक्षांना विश्वास न घेता अशी मशीन वापरासाठी का आणली? आणि फक्त मुंबई महापालिकेतच पाडू मशीनचा वापर का केला जातोय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT