BMC News  Saam Tv
मुंबई/पुणे

Covid-19 Alert : जगात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला; मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क, दिले 'हे' निर्देश

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार रेड अलर्टवर आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Covid-19 News : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार रेड अलर्टवर आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने देखील कोरोनाविषयी निर्देश जारी केले आहेत. (Latest Marathi News)

मुंबई महानगरपालिकेने (BMC) विविध उपक्रमांद्वारे कोविड-19 विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी दृढ वचनबद्धता दर्शविली आहे. मुंबई महापालिकेकडून कोरोनासाथ नियंत्रित करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीवर भर देण्यात येणार आहे. तसेच लसीकरणाचाही वेग वाढविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, इतरांपासून शारीरिक अंतर राखण्याची विनंती केली आहे.

कोविड-19 रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रुग्णालये आणि बेड, ऑक्सिजन सुविधा यासारखी संसाधने उपलब्ध करण्यात येणार आहे.

केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानतळ प्राधिकरण हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटी-पीसीआर चाचणी नमुने घेणार आहे. तर सर्व पॉझिटिव्ह नमुने संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंगसाठी NIV, पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील. त्याच बरोबर कोविड वॉर्ड वॉर रूम 24 x 7 कार्यरत आहेत. नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलेंडर्स आणि PSA टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. मुंबईत कोविड-19 रूग्णांवर उपचार करणारी 2 रुग्णालये आहेत, सेव्हन हिल्स (1700) आणि कस्तुरबा (35), चार सरकारी रुग्णालये २७ खासगी रुग्णालय सज्ज आहेत.

कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी खाली दिलेल्या योग्य वर्तनाचे पालन करणे महत्वाचे

● सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे

● इतरांपासून अंतर राखणे

● साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आणि

● आजारी असताना घरी अलगीकरणात राहणे.

● वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

● सर्व नागरिकांनी लसीकरण आणि प्रिकॉशनरी डोस घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

SCROLL FOR NEXT