Eknath Shinde
Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : मुंबई महापालिका औषध खरेदीची चौकशी करणार; CM शिंदेंची विधानसभेत घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

CM Eknath Shinde - मुंबई महापालिकेत यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसेच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत केली.

मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.

यावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या सूचने प्रमाणे 5000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे 5500 आशा वर्कर्सची भरती करण्यात येईल अशी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली.

या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर सहभागी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT