Mumbai Metro Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro : मुंबईतील मेट्रोसाठी अजून वेट अँण्ड वॉच, 'या' प्रमुख मेट्रो प्रकल्पांना होणार विलंब

Metro Project Updates : मुंबईतील दोन मेट्रो प्रकल्पांना मुदतवाढ मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मागणीनंतर MMRDA ने संबंधित माहिती दिली आहे.

Yash Shirke

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai Metro Updates : MMRDA च्या मेट्रो प्रकल्पांना मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७ अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) या दोन प्रकल्पांसाठी नव्याने मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचा कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ रोजी निघाला होता. पण काही अडथळांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणी शाखेकडे दोन्ही प्रकल्पांविषयी माहिती विचारली होती. त्यावर कार्यकारी अभियंते सचिन कोठावळे यांनी 'मेट्रो मार्ग ९ आणि मेट्रो मार्ग ७ अ या प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता मेट्रो मार्ग ९ साठी जून २०२५ तर मेट्रो मार्ग ७ अ साठी जुलै २०२६ अशी अंतिम मुदत देण्यात आली आहे' अशी माहिती दिली आहे.

मेट्रो मार्ग ९ हा दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर असा आहे. या मार्गाचे काम पूर्ण करण्याची तारीख ८ सप्टेंबर २०२२ होती. आता हे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करायचे आहे. तर मेट्रो मार्ग ७ अ हा अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल असा आहे. या मार्गाचे काम पूर्ण करण्याची तारीख ८ मार्च २०२३ होती. आता हे काम जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मते, मेट्रोसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या विलंबाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध होत नाही. शिवाय खर्चात वाढ होत असल्याने जनतेच्या करांचा पैसा वाया जातो. तेव्हा जबाबदार व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करावी आणि कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT