Mumbai Mhada Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

MHADA lottery Mumbai : मुंबईत म्हाडाकडून २,६४० घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्रता, किंमत, लोकेशन आणि अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

MHADA Mumbai lottery 2026 how to apply online step by step : मुंबईमध्ये हक्काचे आणि स्वप्नातील घर घेण्याची प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते. पण अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे अनेकांचं हे घराचे स्वप्न सत्यात उतरत नाही. पण म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण) हे तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे. मुंबईमध्ये म्हाडाकडून २६४० घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली आहेत. आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पाहूयात... (Mumbai MHADA lottery last date application and deposit details)

म्हाडाच्या मुंबई मंडळाने विविध गटांतील २ हजार ६४० घरांसाठी सोडत रविवारी जाहीर केली. यासाठी आज दुपारी ३ वाजता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात विक्रोळी, गोरेगाव, वांद्रे यांसह अनेक भागांतील घरांचा समावेश आहे. हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल आहे. तर घरांची लॉटरी १५ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाईल. अर्जदार २९ एप्रिल रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत म्हाडाच्या housing.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल. अर्जदार ३० एप्रिल रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम जमा करून आपला हक्क निश्चित करू शकतात. (MHADA Mumbai Lottery 2026: Apply for 2,640 Homes, Check Price & Eligibility)

कोणत्या ठिकाणी असतील घरे ?

कन्नमवार नगर विक्रोळी, पत्राचल सिद्धार्थ नगर गोरेगाव, मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर वांद्रे, पंतनगर घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकरडमन्या, डोंगरेगाव, डागरेगाव, पवई, अनाजगाव या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंमत अन् लोकेशन पाहता येतील.

कोणत्या श्रेणीत किती घरे?

अत्यंत कमी उत्पन्न गटासाठी १४५ घरे, कमी उत्पन्न गटासाठी ८५८ घरे, मध्यमवर्गीयांसाठी १४०८ घरे आणि उच्चवर्गीयांसाठी २२९ घरांचा लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई बोर्डाकडून तयार होत असलेल्या प्रकल्पातील १७६२ घरे, पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ३७१ घरे, ३३/७ योजनेअंतर्गत मिळालेली १५८ घरांचाही लॉटरीमध्ये समावेश आहे. त्याशिवाय मागील लॉटरीत न विकलेली ३१९ घरे पुन्हा लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

Kolhapur : कोल्हापूरात थरार! मुलाने कुऱ्हाडीने केली बापची हत्या, सख्ख्या भावाचाही जीव घेतला, कारण फक्त…?

SCROLL FOR NEXT