Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबईकरांना मिळणार नवी मेट्रो; मीरा भाईंदरकरांचा प्रवास होणार सुसाट, नेमके किती थांबा अन् तिकीटांचे दर किती?

Mumbai Metro Line 9: दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या मेट्रो लाईन ९ च्या ४.५ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. या मेट्रो मार्गिकेचं ९६% काम पूर्ण झालं असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईला लवकरच नवी मेट्रो मिळणार आहे. दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या मेट्रो लाईन ९ च्या ४.५ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. या चाचणीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित होते. तिन्ही नेत्यांनी मोटरमन कॅबिनमध्ये बसून मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानुसार, या मेट्रो मार्गिकेचं ९६% काम पूर्ण झालं आहे. उर्वरित काम आणि चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबरअखेर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मेट्रो ९ चा पहिला टप्पा ४.४ किमी लांबीचा आहे. यामध्ये एकूण ८ स्थानके असणार असून, पहिल्या टप्प्यात ४ स्थानके असणार असल्याची माहिती आहे. ज्यात दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव या स्थानकांचा समावेश असणार आहे. मेट्रो ९मुळे मीरा भाईंदर, दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो लाईन ९ ही दहिसर (पूर्व) ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम (भाईंदर) दरम्यान असलेली लाईन असून, ही मेट्रो लाईन ७ ची विस्तारिका आहे. जी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे विकसीत केली जात आहे. मुंबई मेट्रो लाईन ९ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरांतील प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

मेट्रो ९ बाबत मुख्यमंत्री म्हणतात, "महामुंबई मेट्रो 9 हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मेट्रोमुळे मीरा-भाईंदर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल. एमएमआर रिजनमध्ये पहिल्यांदाच डबल चेंजर ब्रिज तयार करण्यात येणार आहे. यात मेट्रो आणि गाड्यांचा ब्रिज एकाच स्ट्रक्चरमध्ये पहायला मिळणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. याचे एक्स्टेंशन विरारपर्यंत होणार आहे. २०२७ अखेरपर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Rashmika Mandanna Engagement : रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

SCROLL FOR NEXT