Mumbai Metro Line 12 Kalyan To Taloja Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro Line12: कल्याण ते तळोजा मेट्रो कधी धावणार, कुठे असेल थांबा, कसा मार्ग जाणून घ्या सर्व माहिती

Mumbai Metro Line 12 Kalyan To Taloja: मुंबई मेट्रो लाईन 12 कल्याण ते तळोजाला जोडणारा मार्ग आहे. हा मार्ग 22.17 किमी अंतराचा असून या मार्गात 19 स्थानकं असणार आहेत. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी कमी होणार आहे.

Bharat Jadhav

मुंबईकर आणि उपनगरातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उपनगरातून मुंबईला जाणं जलद होणार आहे. लवकरच मुंबईत 12 वी मेट्रो कल्याण ते तळोजा लाइन सेवेत येणार आहे. मुंबई मेट्रोचा 22.17 किमीचा विस्तार होणार असून ही मेट्रो लाईन कल्याण आणि तळोजा या प्रमुख औद्योगिक आणि निवासी क्षेत्राशी जोडला जाणार आहे. ही मेट्रो लाइन्समुळे प्रवासाचा वेळ कमी करेल. तसेच मेट्रो लाइनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत करणार आहे.

शहराचा विकास आणि प्रगती करणारा हा मेट्रो मार्ग 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कल्याण आणि तळोजाला जोडणाऱ्या या मेट्रो लाइनवर 19 स्टेशन असणार आहेत. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (MMRDA) ने मेट्रो लाईन 12 साठी पिल्लर उभारण्यास सुरुवात करण्यात आलीय. या कॉरिडॉरमध्ये 19 स्थानके असणार आहेत. कल्याण, डोंबिवली आणि तळोजा दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे 45 मिनिटांनी कमी होणार आहे. नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आलाय.

असा आहे, मुंबई मेट्रो लाईन 12 चा प्रकल्प

किती अंतराचा असेल मार्ग- 22.17 किलोमीटर

किती स्टेशन संख्या - 19

कोण-कोणत्या भागातून जाणार मेट्रो- कल्याण, डोबिंवली, तळोजा, कोळेगाव

प्रकल्प कधी सुरू झाला

मार्च 2024 कधी पूर्ण होणार डिसेंबर 31, 2027

प्रकल्प खर्च - 5,865 कोटी

कसा असेल मार्ग

मेट्रो लाईन 12 चा मार्ग कल्याण ते तळोजाला जोडणारा आहे. ही मेट्रो डोंबिवली आणि कोळेगावमधून जाणार असून कल्याण येथील लाईन 5 (ऑरेंज लाईन) ला जोडणारा आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांनी कमी होईल. तसेच रस्ते आणि लोकल ट्रेन्सवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

कोण- कोणते स्टेशन असतील

कल्याण एपीएमसी - मेट्रो लाईन 5 - ऑरेंज लाईनवरील इंटरचेंज

कल्याण

गणेश नगर (कल्याण)

पिसावली गाव

गोळवली

डोंबिवली एमआयडीसी

सागाव

सोनारपाडा

मानपाडा

हेडुटेन

कोळे गाव

निलजे गाव

वडवली

गाठ

वॉकलन

तुर्भे

पिसर्वे डेपो

पिसर्वे

अमानदूत (तळोजा) – नवी मुंबई मेट्रो लाईन १ वर इंटरचेंज

कल्याण मेट्रोपासून ही ठिकाणं असतील जवळ

दुर्गाडी किल्ला: कल्याणमध्ये असलेला हा ऐतिहासिक किल्ला प्रस्तावित कल्याण मेट्रो स्टेशनपासून सुमारे दोन किमी अंतरावर आहे.

काळा तालाब तलाव: कल्याणमध्ये असलेला हा सुंदर तलाव कल्याण मेट्रो स्टेशनपासून तीन किमी अंतरावर आहे.

गणेश घाट: कल्याण मेट्रो स्टेशनपासून सुमारे चार किमी अंतरावर असलेलं गणेश घाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT