Mumbai Metro  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro : लोकलचा भार हलका होणार, एकाच महिन्यात ४ मेट्रो मार्ग सुरू होणार, वाचा कोणकोणत्या भागाला होणार फायदा?

Mumbai Metro Expansion: मुंबईमध्ये डिसेंबरपर्यंत चार नवे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. मेट्रो 9 (दहिसर ते काशीगाव), मेट्रो 2B (मंडाळे ते डायमंड गार्डन), मेट्रो 4 (कॅडबरी ते गायमुख) आणि वरळी ते कफ परेड. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि घोडबंदर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • डिसेंबरअखेरपर्यंत मुंबईत मेट्रोचे चार नवे मार्ग सुरू होणार.

  • मेट्रो ९, मेट्रो २ बी, मेट्रो ४ आणि वरळी-कफ परेड मार्गिकांचा समावेश.

  • ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार.

  • लोकलवरील गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होणार.

Which new Mumbai Metro lines are starting in December? : मुंबई आणि उपनगात वाढती लोकसंख्या आणि वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरतो. त्यामुळेच मुंबई आणि महानगरामधील वाढत्या वाहतूक कोंडी आणि लोकलच्या भयानक गर्दीवर मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विकसीत केले जातेय. त्यामध्ये आता आणखी चार मार्गाची भर पडणार आहे. डिसेंबर अखेपर्यंत मुंबईमध्ये चार नवे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईचा प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि गारेगार होणार आहे. (Mumbai Metro new routes 2025 details )

सध्या मुंबईमध्ये तीन मेट्रो मार्गिका सुरू आहेत. दररोज मुंबई मेट्रोमधून शेकडो लोक प्रवास करतात. वाहतूक कोंडी अडकण्यापेक्षा मेट्रोतून गारेगार प्रवास करण्यास अनेकांची पसंती असते. मुंबई मेट्रोमध्ये आता आणखी चार मार्गाची भर पडणार आहे. डिसेंबरपर्यंत मेट्रो ९, मेट्रो २ ब, मेट्रो ४ आणि मेट्रो ४ ब या मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मेट्रो ३ मधीलही एक टप्पा लवकरच सुरू होऊ शकतो.

अंधेरी ते घटकोपर, अंधेरी पश्चिम-दहिसर ते गुंदवली आणि आरे ते वरळी या तीन मार्गावर सध्या मेट्रो धावत आहेत. या तिन्ही मार्गावर दररोज ८ ते १० लाख मुंबईकर प्रवास करतात. या वर्षाअखेरीस आणखी चार मेट्रो मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दहिसर पूर्व- काशीगाव मेट्रो-9, मंडाळे डायमंड गार्डन मेट्रो-2 बी, मेट्रो-4 आणि मेट्रो-4 ए या मार्गिकांचा समावेश आहे. या मेट्रो प्रकल्पाची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. त्याशिवाय वरळी ते कफ परेड या मार्गावरील मेट्रोही लवकरच धावण्याची शक्यता आहे.

मेट्रो 9 (पहिला टप्पा) :

दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो 9 मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील पहिल्या ४.५ किमीचा टप्प्याचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झालेय. पहिला टप्पा डिसेंबर अखेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरा गाव, काशीगाव ही स्थानके असतील. सध्या या मार्गावर चाचण्या सुरू आहेत. हा मार्ग पुढे मेट्रो २ ए, आणि मेट्रो ७ ला जोडला जाणार आहे.

मेट्रो-4 आणि 4- ए (पहिला टप्पा):

कॅडबरी ते गायमुख हा मेट्रो प्रकल्प ३५ किमीचा आहे. यापैकी ५.३ किमीची मार्गिका डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवर कॅडबरी, माजीवडा, कारबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा, गायमुख ही स्थानकं आहेत. या मेट्रो मार्गामुळे ठाणे आणि घोडबंदरवरील वाहतूककोंडी सुटण्याची शक्यता आहे.

मेट्रो-2 बी (पहिला टप्पा) :

मंडाळे ते डायमंड गार्डन या मार्गावरील 5.3 किमीचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे. मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन ही स्थानकं या मार्गावर आहेत. सध्या या मेट्रो मार्गावर वेगवेगळ्या चाचण्या सुरू आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी मंडाळे ते अंधेरी यादरम्यानची ही महत्त्वपूर्ण मार्गिक आहे.

वरळी-कफ परेड:

मुंबईतील मेट्रो-3 हा प्रकल्पही लवकरच सेवेत येणार आहे. भुयारी मेट्रो प्रकल्प असलेल्या आरे-कफ परेड या मेट्रो 3च्या वरळी ते कफ परेड या सुमारे 9 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. लवकरच हा मार्ग नागरिकांच्या सेवेत येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळकोकणात लाडक्या बाप्पाचं आगमन भक्ताचा उत्साह शिगेला

Manoj Jarange Patil: इंग्रजांच्या काळात आंदोलनाला परवानगी, पण फडणवीसांच्या काळात नाही; मनोज जरांगे कडाडले|VIDEO

Kunickaa Sadanand: 'सलमानला सपोर्ट केल्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या...', बिग बॉस १९मधील कुनिकाचा धक्कादायक खुलासा

बलात्काराची धमकी, २३ लाखांची खंडणी; हनी ट्रॅपमध्ये क्लब मालक अडकला, शेवटी संपवलं आयुष्य

Parle G In America: अमेरिकेत किती रुपयांना मिळतो Parle-G, किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT