Mumbai Metro  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro 2: डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार, ५.३९ किमीचा मार्ग अन् ५ स्थानके; कधीपासून सुरू होणार?

Mumbai News: मुंबईमध्ये नवी मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहे. डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार आहे. ५.३९ किमीचा हा मार्ग असून त्यावर ५ स्थानके आहेत. वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • मुंबई मेट्रो २बीचा डायमंड गार्डन – मंडाले टप्पा सप्टेंबर अखेरीस सुरू होणार आहे.

  • ५.३९ किमी लांबीचा मार्ग आणि ५ स्थानकांचा समावेश आहे.

  • सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवा सुरू केली जाईल.

  • या मार्गामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

मुंबईत आणखी एका मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. एमएमआरडीएने अंधेरी पश्चिम - मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले असा पहिला टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरअखेरील या मार्गावरून मेट्रो सुरू होईल असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. पण आता या मार्गावरून मेट्रोसेवा डिसेंबरऐवजी सप्टेंबरअखेरील सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मंडाले ते डायमंड गार्डन हा प्रवास सुसाट आणि आरामदाी होणार आहे. महत्वाचे म्हणजे त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

मेट्रो २बीच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल सुत्रांनी सांगितले की, डायमंड गार्डन आणि डीएननगर दरम्यान या मार्गाचे काम जवळपास ८८ टक्के पूर्ण झाले आहे. मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानके, सर्व यंत्रणा आणि विद्युतीकरणाचे काम सुरू होईल आणि २०२६ च्या सुरुवातीला हा प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होईल. या मार्गासाठी डेपो आधीच तयार आहे.

तर मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणारी संस्था असलेल्या एमएमआरडीएने सांगितले की, दोन्ही विभागांवर प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरूवात झाली. मेट्रो रेल्वे सुरक्षा टीमकडून बांधकामाच्या चाचण्यांना सुरूवात केली आहे. या सर्व चाचण्या व्यवस्थित झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गावरील मेट्रोसेवा सप्टेंबर अखेरीस सुरू केली जाईल.

दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार अंधेरी पश्चिम ते मंडाले असा मेट्रो २ ब मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २२ किमी लांबीच्या आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. मेटो २ बच्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व उपनगरातील मांडले ते डायमंड गार्डनपर्यंतचा ५.३९ किमीचा मार्ग आहे. या टप्प्यामध्ये ५ स्थानके आहेत. यामध्ये मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन यांचा समावेश आहे. या मार्गावर मेट्रोसेवा सुरू झाल्यानंतर दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT