Mumbai Mega Block  x
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे हाल होणार; कसं आहे रेल्वेचं वेळापत्रक? वाचा

Mega Block News : मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी २२ जून रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक राहणार असल्याची माहिती दिली आहे. यासंबंधित वेळापत्रक मध्य रेल्वेने प्रसारित केले आहे.

Yash Shirke

Mega Block : रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबईत रविवारी २२ जून रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक चालवला जाणार आहे. रविवारी चार तास माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन मध्य मार्गावर आणि मानखुर्द ते नेरुळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. प्रशासनाने यासंबंधित वेळापत्रक जारी केले आहे.

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

मानखुर्द आणि नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा ११.१५ ते १६.१५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.१८ ते १५.२८ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३७ ते १५.४५ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मानखुर्द आणि पनवेल - नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Salman Khan: 'माझा मोठा भाऊ...'; संजू बाबासाठी रात्री १.४० वाजता सलमान खानने केली प्रेमळ भावूक पोस्ट

Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

SCROLL FOR NEXT