Mumbai Mega Block  x
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? कसा कराल प्रवास? वाचा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : रेल्वेची देखभालीची कामे करण्यासाठी रविवार १५ जून रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारच्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक जारी केले आहे.

Yash Shirke

Mega Block : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार १५ जून २०२५ रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर आणि पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावर पाच तास मेगा ब्लॉक असणार आहे.

सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर (सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५)

रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाउन धीम्या लोकल गाड्या या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि त्यानंतर विद्याविहारपासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे, घाटकोपर येथून सकाळी १०:१९ ते दुपारी ३:५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या या विद्याविहार आणि CSMT दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्यांचा थांबा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर असेल.

पनवेल-वाशी अप आणि डाउन धीम्या मार्गावर (सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५)

रविवारी पनवेलहून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील ट्रेन आणि सीएसएमटीहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ट्रेन सेवा रद्द राहतील. दुसऱ्या बाजूला, पनवेलहून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ या वेळेत रद्द करण्यात येतील. तसेच, ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० या वेळेत रद्द राहतील.

ब्लॉक काळात -

- सीएसएमटी - वाशी यादरम्यान विशेष लोकल रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.

- ठाणे - वाशी/ नेरुळ या दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सुरु असेल.

- बंदर लाईन सेवा उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक होणार? शोक सभेदरम्यान बड्या नेत्याने तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT