Mumbai Police News  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : कामावर जायला निघाले अन्... मुंबईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे निधन

Mumbai Police News : मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन. पोलीस दलात शोककळा.

Alisha Khedekar

  • मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचे निधन

  • हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  • काही महिन्यांपूर्वीच त्यांनी कुरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली

  • त्यांच्या निधनामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली.

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुशील कुमार गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वीच कुरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यापूर्वी ते पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीनंतर त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच कुरार पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली.तसेच त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलात अधिकाऱ्यांना अनेकदा खूप वेळ काम करावे लागते, अनियमित दिनचर्या, सततचा मानसिक ताण आणि विविध जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागतो.

कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे अशा अनेक कामांमुळे पोलिसांवरील जबाबदाऱ्यांचा भार वाढत असतो. गायकवाड यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या आरोग्याचा आणि कामाच्या ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Diya Vastu Tips : दिवाळीत घरात कोणत्या दिशेला पणती- दिवे लावणे शुभ? देवी लक्ष्मीची कृपा राहील, पैशांची भरभराट होईल

Apple health benefits: सालासह खावं की सोलून? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सफरचंद खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Oily Skin Makeup Tips: मेकअप केल्यानंतर चेहरा तेलकट दिसतोय? वापरून पाहा 'या' सोप्या टिप्स

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात; 14 टेबलवर मोजणी

Healthy Habits : दररोज सकाळी स्वतःसाठी राखून ठेवा ३० मिनिटे; 'या' सवयी तुम्हाला ठेवतील निरोगी आणि फिट

SCROLL FOR NEXT