Fire breaks out in Malad East’s Pathanwadi area; 15 to 20 shops gutted, video goes viral on social media. saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मालाडच्या पठाणवाडी परिसरातील १५ ते २० गोडाऊनला भीषण आग|Video Viral

Malad East Godown Fire: मालाड पूर्वेकडील पठाणवाडी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यात १५ ते २० दुकाने जळून खाक झाले आहेत. मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी ६ अग्निशमन गाड्या पाठवल्या. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • मालाड पूर्व पठाणवाडी पिंपरी पाडा भागातील १५ ते २० गाळ्यांना भीषण आग

  • दुपारी १२.५४ वाजता आग लगाल्याची घटना घडलीय.

  • मुंबई अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मालाड पूर्वमधील पठाणवाडतील पिंपरी पाडामध्ये असलेल्या १५ ते २० गाळ्यांना भीषण आग लागल्याची घटना घडलीय. दुपारी १२.५४ वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच तत्काळ दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर आटोक्यात आली आहे. आता कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग लागल्याच्या गोडाऊनमध्ये फर्निचर, काही केबल्स ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये.

येथील १५ ते २० गाळ्यांना आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, बीएमसीचे विभागीय अधिकारी, १०८ रुग्णवाहिका तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटीचे पथक दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाने या आगीला स्तर-२ (Level-II) घोषित करून नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केलेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : नातं कायमच तुटलं! स्मृतीने पलाशला सोशल मीडियावरूनही केलं अनफॉलो

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत मुलींचा सहभाग ठरला लक्षवेधी

Shivaji maharaj diet: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायचा?

स्मृतीने अखेर लग्नावर मौन सोडलं, मोठा निर्णय घेतला; पलाशचीही त्याच वेळी पोस्ट.. वाचा कोण काय म्हणाले

Chapati Side Effects: चपातीमुळे वाढतं वजन अन् शुगर वाढते का? अमेरिकन ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT