Mumbai Local Turns Crime Scene 
मुंबई/पुणे

मुंबई लोकलमध्ये थरारनाट्य! दरवाजा बंद करण्यावरून चाकूने वार, संपूर्ण डब्ब्यात रक्तच रक्त; अंगावर काटा आणणारा Video

Mumbai Local Train News : मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे भीषण रूपांतर झाले. २२ वर्षीय तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली. या रक्तरंजित घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Turns Crime Scene: मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. पण याच लोकलमधील अंगावर काटा आणणारी एक भयंकर घटना घडली. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून धावत्या ट्रेनमध्ये २२ वर्षांच्या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या रक्तरंजित थराराचा एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ (Video) समोर आलाय. या व्हिडीओत आरोपीच्या हातात चाकू दिसतोय अन् संपूर्ण लोकल डब्यात रक्त दिसत आहे. तर दारात तरूण तडफडत असल्याचे भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेय.

त्या लोकलमध्ये नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये मंगळवारी रात्री २२ वर्षीय मयंक लोहार या तरुण प्रवाशाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बोरीवली स्टेशनवर रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि वैद्यकीय पथकाने केलेल्या तातडीच्या कारवाईचा अधिकृत घटनाक्रम समोर आला आहे.

वाद कशामुळे झाला?

पीडित मयंक आणि आरोपी दोघेही अंधेरी स्थानकातून एकाच डब्यात चढले होते. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनमध्ये आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केले आणि त्याला गंभीर जखमी केले. बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०६ वर ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच, आरोपी चालत्या गाडीतून उतरून गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेला.

'मिनिटन्-मिनिट' अधिकृत घटनाक्रम समोर (Timeline)

घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तात्काळ आढावा घेण्यासाठी बोरीवली स्टेशनवर पोहोचले होते.

  • रात्री २३:०४ वाजता – घटना घडलेली लोकल बोरीवली स्टेशनवर पोहोचली.

  • रात्री २३:०७ वाजता – अवघ्या ३ मिनिटांत आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) कर्मचारी डब्यात पोहोचले. त्यांनी जखमी प्रवाशाला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी वैद्यकीय पथक, स्ट्रेचर आणि पोर्टर डब्यापाशी हजर झाले.

  • रात्री २३:१२ वाजता – जखमी मयंकला डब्यातून बाहेर काढून तातडीच्या आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आले.

  • रात्री २३:२२ वाजता – स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षातील (EMR) डॉक्टरांनी मयंकची कसून तपासणी केली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  • रात्री २३:४२ वाजता – आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मृतदेह रुग्णवाहिकेने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आला.

रेल्वे प्रशासनाची भूमिका काय?

या गंभीर गुन्ह्याचा तपास सध्या शासकीय रेल्वे पोलीस (GRP) करत आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासन तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. घटनेचा छडा लावण्यासाठी स्टेशन परिसर आणि रेल्वेतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज व इतर संबंधित पुरावे रेल्वेने तात्काळ ताब्यात घेऊन तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत.पोलिसांकडून सध्या आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांततेचे आवाहन केले असून आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Maharashtra News Live Update:एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT