लस घेणाऱ्यांना लवकरच मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी ? Saam Tv
मुंबई/पुणे

लस घेणाऱ्यांना लवकरच मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी ?

ज्या शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तेथे गेल्या मंगळवारपासून अनेक सूट देण्यात आली. मात्र मुंबईकरांची बहुप्रतिक्षित प्रवासी ट्रेन सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाचा Corona कहर शमल्यानंतर महाराष्ट्रातील Maharashtra अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तेथे गेल्या मंगळवारपासून अनेक सूट देण्यात आली. मात्र मुंबईकरांची बहुप्रतिक्षित प्रवासी ट्रेन (mumbai Local Train) सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांनी हे स्पष्ट केले आहे की, सध्या सामान्य लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय नंतर घेतला जाईल असे त्यांनी म्हटले होते.

या दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या Bombay High Court मुख्य न्यायाधीशांनी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांसाठी स्वतंत्र लोकल पास देण्याची व्यवस्था सुचवली. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याच्या प्रकरणाची सुनावणी कोर्ट करत होते. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या प्रकरणाची सुनावणी आता पुढील गुरुवारी होणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला लागली आग

Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Potato Recipe : बटाट्याला द्या चटपटीत ट्विस्ट, फक्त १० मिनिटांत बनवा 'ही' प्रसिद्ध चाट रेसिपी

SCROLL FOR NEXT