Mumbai Local Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

Mumbai Rain News: कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे. मध्य रेल्वेचे अप आणि डाऊन मार्ग सुरू झाला आहे. कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पुन्हा सुरु झाली आहे. मध्य रेल्वेवर ठाण्यापासून ठप्प झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा सुरळीत झाली आहे. तसेच कसारा, कल्याण , डोंबिवली, ठाणे, खोपोली येथून मुंबईकडे येणारी वाहतूक देखील सुरळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरी मुंबई लोकल १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहे. तर मेल एक्सप्रेसगाड्या नियोजित वेळेनुसार सुटणार आहेत.

दरम्यान, मुंबईत 300 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. वडाळा, जीटीबी रेल्वे स्टेशनदरम्यान पाणी साचल्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. याशिवाय मुसळधार पावसाचा बोरिवली स्टेशनलाही फटका बसला होता. बोरिवली स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ट्रॅकवरही पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली होती.

तसेच मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला होता. विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

तर कल्याण रेल्वेस्थानकावर प्रावशांची मोठी गर्दी झाली होती. सीएसएमटी ते ठाणे दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस गाड्या जात नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र आता लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT