Mumbai Local Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local : मध्य रेल्वेचा खोळंबा, १५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द , नेमकं कारण काय?

mumbai local train issue: मुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शुक्रवारी एक्स्प्रेसच्या धडकेत एका मोटरमनचा मृत्यू झाला होता. मात्र ती आत्महत्या असल्याचा दावा मोटमनच्या संघटनांनी केला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Local Train News:

मुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शुक्रवारी एक्स्प्रेसच्या धडकेत एका मोटरमनचा मृत्यू झाला होता. मात्र ती आत्महत्या असल्याचा दावा मोटमनच्या संघटनांनी केला आहे. या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला मोटरमन गेल्याने १५० हून अधिक लोकल ट्रेन रद्द झाल्या आहेत. तर काही तासानंतर आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मुंबईत सिग्नल पासिंगची घटना घडल्यानंतर मोटरमॅन मुरलीधर शर्मा यांचा काल प्रगती एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला होता. मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा मृत्यू झाल्याने बहुतेक मोटरमन त्यांच्या अंत्यविधीला गेले. तर बहुतांश मोटरनमनने अतिरिक्त काम करण्यासाठी नकार दिला. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोटरनमन कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मध्य रेल्वेच्या आणि हार्बर मार्गावरील जवळपास दीडशेपेक्षा अधिक लोकल सेवा रद्द झाल्या आहेत. ऐन सायंकाळच्या वेळी कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर घरी जाणाऱ्या नोकरदारांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संघटनांचा रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप

मोटरमन शर्मा यांच्या अपघातीमृत्यूनंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मुंबई विभागाने मध्य रेल्वेला दोषी ठरवत आरोप केले आहेत. मोटरमन कर्मचारी अतिरिक्त काम करतात. मात्र, त्यांच्याकडून चुकून सिग्नल ओलांडल्यास त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, घटनांना इतर बाबी जबाबदार असतातत. मोटरमनच्या जागा रिक्त असल्याने अतिरिक्त काम करावे लागत आहे, असं सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे म्हणणं आहे.

ठाण्यासह अनेक स्टेशनवर तुफान गर्दी

मध्य रेल्वे खोळंबळ्यानंतर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. मोटरमन कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम न करण्याच्या भूमिकेमुळे वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. ठाण्यातून कल्याण अणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनसाठी प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT