Mumbai Local Train Mobile Theft News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Theft: चपलांमुळं अडकला सापळ्यात... तपास चक्रावणारा, मुंबई लोकलमधील २ लाखांच्या मोबाइल चोरीचा उलगडा

Mumbai Local Train Theft News: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वस्तू चोरीला जाण्याचा घटना समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Train Theft News: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वस्तू चोरीला जाण्याचा घटना समोर येत आहे. अशातच सीएसएमटी स्थानकावरून २ लाखांचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेने केली होती. रेल्वे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीच्या चालण्यावरून आणि चप्पलेच्या निशाणीवरून त्याची ओळख पटवली आहे.(Latest Marathi News)

रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीसह त्याच्या एका साथीदाराला तातडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी ट्रेनमधील मोबाईल फोन घेतल्याची कबुली दिली. हेमराज बन्सिवाल (वय ३०) असं अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचं नाव आहे.

हेमराज बन्सिवाल हा कुर्ला येथील राहणारा असून तो टी-शर्ट विक्रेता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) प्रवास करत होती. यावेळी ती सीएसएमटी स्थानकात उतरली तेव्हा तिला आपला मोबाईल फोन हरवल्याचे लक्षात आले.

तिने त्याच ट्रेनमध्ये फर्स्टक्लासच्या डब्यात परत जाऊन पाहिले तेव्हा मोबाईल फोन तिकडे नव्हता. या मोबाईल फोनची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी होती. इतका महागडा फोन हरवल्यानंतर ही महिला घाबरीघुबरी झाली.

तिने तातडीने रेल्वे पोलिसांकडे (Police) धाव घेतली. या महिलेने २५ मे रोजी रेल्वे पोलिसांकडे मोबाईल फोन हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी CSMT स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. त्यामध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात चढत असल्याचे दिसले.

पोलिसांना एक संशयित व्यक्ती हा व्यक्ती सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीचा चेहरा ब्लर दिसत होता. त्यामुळे त्याची नेमकी ओळख पटवणे शक्य होत नव्हते. त्यावर रेल्वे पोलिसांनी एक युक्ती शोधून काढली.

पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमधील व्यक्तीच्या पायातील चपला आणि चालण्याच्या लकबीवर लक्ष केंद्रीत केले. ज्या महिलेचा मोबाईल फोन हरवला होता ती सकाळी साडेअकराची वेळ होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी याच वेळेत येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. (Breaking Marathi News)

दरम्यान, दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास पोलिसांना तशाच चपला घातलेला आणि चालण्याची विशिष्ट लकब असलेला व्यक्ती दिसला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी ट्रेनमधील मोबाईल फोन घेतल्याची कबुली दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

Mahalaxmi Rajyog 2025: भूमिपुत्र मंगळ बनवणार पॉवरफुल योग; 'या' ३ राशींच्या व्यक्तींवर पडणार नोटांचा पाऊस

ED चं खोटं पत्र, अर्थमंत्र्यांच्या नावानं वॉरंट; पुण्यातल्या महिलेची ९९ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT