Mumbai AC Local Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: रेल्वेचं मुंबईकरांसाठी दिवाळी गिफ्ट, नव्या २३ एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत, नॉन एसी लोकल कमी होणार का?

Mumbai Local Train: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

Vishal Gangurde

Mumbai Local Train:

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज सोमवारपासून नव्या २३ एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. १० नव्या एसी लोकल या मध्य रेल्वेमार्गावर धावणार आहेत. तर १७ नव्या एसी लोकल या पश्चिम मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. (Latest Marathi News)

मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या नव्या एसी लोकल या नॉन एसी लोकलची जागा घेणार आहे. या नव्या एसी लोकलमुळे नेहमी नॉन एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अडचण होणार आहे. तर हा निर्णय एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासायक ठरणार आहे.

आता मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलची संख्या ६६ होणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर एसी लोकलची संख्या ९६ होणार आहे. आता मुंबईकरांसाठी एकूण १६२ एसी लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या या एसी लोकल सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहे. मध्य रेल्वेवर नव्या एसी लोकल सोमवार ते शनिवारी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असणार आहेत. तसेच नव्याने दाखल झालेल्या एसी लोकल या रविवार आणि सुट्टीच्या दिवशी धावणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

रेल्वे प्रवाशांनी केले होते आंदोलन

मध्य रेल्वेवर गेल्या वर्षी बदलापूर आणि कळवा येथून मध्य रेल्वे नॉन एसी लोकल ऐवजी एसी लोकल सुरु केली होती. त्यावेळी कळव्यातील प्रवाशांनी एसी लोकलचा विरोध केला होता. त्यानंतर प्रवाशांच्या रोषानंतर मध्य रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

SCROLL FOR NEXT