Mumbai Local Crime AI PHOTO
मुंबई/पुणे

Mumbai Local Crime : मुंबई लोकलमध्ये संतापजनक घटना! तरुणीचा विनयभंग करून ट्रेनखाली ढकललं | VIDEO

Mumbai Local Women Safety : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मालाडहून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग करून नायगाव स्थानकात तिला ट्रेनखाली ढकलल्याची धक्कादायक घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकलमध्ये विनयभंग, तरूणीला ट्रेनखाली फेकलं

तरुणीचा हात तुटला, थरकाप उडवणारी घटना

महिलांसाठी लोकल प्रवास असुरक्षित

साम टीव्ही प्रतिनिधी मुंबई - मनोज तांबे आणि संजय गडदे

मुंबईतून संतापजनक बातमी समोर आली आहे. महिलांनो तुम्हीही लोकल ट्रेनमधून प्रवास करत असाल तर स्वतःच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या. मुंबई लोकलमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. लोकलमध्ये एका तरूणीचा विनयभंग करून तिला ट्रेनखाली फेकलं गेले, यामुळे मुंबई चांगलीच हादरली आहे.

लोकलमधील भांडणे मग ती पुरुषांची असो की महिला प्रवाशांची नित्याचीच झाली आहेत. मात्र आता ही भांडणे एकमेकांचा जीव घेऊ लागली आहेत. हो! हे वास्तव आहे. मालाडहून विरार लोकलने नायगावला जात असताना एका तरुणीच्या वाट्याला असाच प्रसंग आला. लोकलमध्ये गर्दीमुळे दिव्यांगांच्या डब्यात चढलेल्या तरुणीचा एका प्रवाशाने विनयभंग केला.इतकंच नाही तर नायगाव स्टेशनला तिला लोकलखाली ढकलून दिले.

घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे पीडितेला एक हात गमावावा लागलाय. ट्रॅकवर झोपल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना पीडित तरुणीने आपली आपबिती सांगितली. मुंबईतील कूपर रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केलाय. रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची टिका केली आहे.

बीएमसीतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केलाय. सरकार केवळ ऐकून घेते आणि कोणतीही ठोस कारवाई करत नाही, अशी टीका केली आहे. गेल्या जून महिन्यात चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. तर जानेवारीमध्ये मालाड स्टेशनजवळ लोकलमधून उतरण्यावरून आणि सीटच्या वादातून एका प्राध्यापकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. दुसरीकडे महिलांच्या डब्यात गर्दुल्यांचे देखील हल्ले होत असतात. आता नायगावमधील ताज्या घटनेने महिलांसाठी लोकल प्रवास असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं महिला सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर उपाय योजण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger: राज्याच्या राजकारणात खळबळ!'त्या' विधानानंतर सुनेत्रा पवारांकडून आमदारांना थेट कॉल; विलीनीकरणाबाबत काय ठरलं?

Transfer : पोलीस दलात मोठे फेरबदल! ३ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे केली नियुक्ती ? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक संशयाच्या भोवऱ्यात

मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव ट्रकची लक्झरी बसला धडक; ३० प्रवाशांनी भरलेली बस थेट पलटी, पुढे काय झालं?

Cheque Book Rule : व्यवहारासाठी CTS चेक बुक चालणार नाही, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT