22 year old stabbed in Mumbai local train 
मुंबई/पुणे

Mumbai Local : मुंबई लोकल हादरली! पावसात डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय तरुणाची चाकून भोसकून हत्या

Mumbai local train door argument incident : मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाले. फर्स्ट क्लास डब्यात २२ वर्षीय प्रवाशावर चाकूहल्ला झाल्याने खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

22 year old stabbed in Mumbai local train : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच 'मुंबई लोकल' पुन्हा एकदा एका रक्ताळलेल्या घटनेने हादरली आहे. मुसळधार पावसात लोकलच्या डब्याचा दरवाजा बंद करण्यासारख्या अत्यंत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चर्चगेट ते नालासोपारा जाणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात एका २२ वर्षीय तरुणावर सहप्रवाशाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या मयंक लोहार (२२ वर्ष) या तरुणाचा खून करण्यात आला. मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून एका दुसऱ्या प्रवाशासोबत वाद झाला. या वादात आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केले. बोरिवली स्थानकावर लोकल पोहोचताच आरोपी पळून गेला. दुर्दैवाने उपचारादरम्यान मयंकचा मृत्यू झाला असून रेल्वे पोलीस (GRP) आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकं काय झालं?

मंगळवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री लोकल ट्रेन गर्दीने भरलेली होती. पावसाचे पाणी डब्यात येऊ नये म्हणून लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून २२ वर्षाच्या मयंक लोहार आणि एका दुसऱ्या सहप्रवाशामध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात त्या अज्ञात आरोपीने चाकू काढला आणि धावत्या ट्रेनमध्येच मयंकच्या पोटात थेट वार केले. मयंक गंभीर रक्ताळलेल्या अवस्थेत डब्यातच कोसळला.

रात्री ठीक ११:०४ वाजता लोकल बोरिवली स्थानकात आली. गाडी पूर्ण थांबण्यापूर्वीच आरोपीने चालत्या गाडीतून उडी मारली आणि गर्दीचा फायदा घेत प्लॅटफॉर्मवरून पळ ठोकला. ट्रेन बोरिवलीत पोहोचताच अवघ्या ३ मिनिटांत रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) घटनास्थळी धावून आले. त्यांनी तात्काळ स्ट्रेचर आणि वैद्यकीय पथक बोलावून मयंकला डब्यातून बाहेर काढले. बोरिवली स्टेशनच्या इमर्जन्सी मेडिकल रूममध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मयंकला रात्री ११:४२ वाजता रुग्णवाहिकेने कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT