Local Railway Mega Block Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: प्रवासी मित्रांनो, इकडे लक्ष द्या ! घराबाहेर पडण्याआधी पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Local Railway Mega Block Update: मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाईल.

Bharat Jadhav

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे रविवारी विश्रांती घेणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद राहणार आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवासी मित्रांनो रविवारी कुठे बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर ,एक मिनिट थांबा. घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रकावर नजर टाका.

रविवारी दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे घराबाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर तो काही काळासाठी थांबवा. रविवारच्या दिवशी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉ घेण्यात येणार आहे. मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा बंद असेल.

तर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येऊन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील व पुढे मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील . या रेल्वे गाड्या निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशीरा गंतव्यस्थानावर पोहोचतील. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान. अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

यादरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील व पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशीरा गंतव्यस्थानावर पोहोचेल. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व यादरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील व पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशीरा गंतव्यस्थानावर पोहोचेल.

पनवेल - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

(नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट लाईन वगळता)

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी भागावर विशेष लोकल चालतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

मेगा ब्लॉक हा पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT