Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असूद्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहून पडा घराबाहेर

Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा.

Priya More

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी लोकलने प्रवास करण्यापूर्वी मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करणे फायदेशीर ठरेल. कारण रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप - डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहिल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकलसेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर मुलुंडपुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलसेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. माटुंगा स्थानकापासून पुढे या लोकल अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलसेवा आपल्या गंतव्य स्थानावर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप - डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा रद्द राहतील. तर पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा पूर्णतः रद्द राहतील.

दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी-नेरुळ ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवास करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

SCROLL FOR NEXT