Mumbai Local Mega Block Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Central Railway Mega Block: रविवारी म्हणजेच १६ जून रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवळी लोकलने प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.

Priya More

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी म्हणजेच १६ जून रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रविवारी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि सीएसएमटी येथून वाशी, पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT