Mumbai Local Train Harbour Line News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train News: मोठी बातमी! हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प

Local Train Harbour Line News: मोठी बातमी! हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Train Harbour Line News: एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी आणि मानखुर्द स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचं समजतंय.

यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन मागील 25 मिनिटांपासून थांबल्या आहेत. तीन ते चार लोकल एकापाठी एक उभ्या आहेत. यातच मोटरमनकडून रेल्वेत अनाउन्समेंट करमुक्त आली आहे की, कोणीही रेल्वे ट्रॅकवर उतरू नये.  (Latest Marathi News)

यातच रुळाला तडे गेल्याने अनेक प्रवाशी रेल्वेत बसून आहेत. रेल्वे कधी सुरु होणार याची प्रवास वाट पाहत आहेत. मात्र रेल्वे रुळाचं काम कधी पूर्ण होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

झुरळांमुळे पुण्यात रेल्वेच थांबवली

दरम्यान, पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की, पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालय. पनवेल आणि मधल्या स्थानकांवर रेल्वेत बसलेले प्रवासी या झुरळांच्या सुळसुळाटामुळे हैराण झालेत. झुरळांचा बंदोबस्त झाल्याशिवाय रेल्वे पुढे न्यायची नाही, अशी प्रवाशांची भूमिकाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी, पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचे वाटप

IAS-IPS Shortage: मोठी बातमी! देशात १३०० IAS तर ५०० IPS पदे रिक्त; केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ अचानक कसा बाहेर आणला गेला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून गंभीर आरोप

Monalisa: 'मला १० वेळा हात लावला...'; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाचा प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Accident: डंपरला धडक देत बसने घेतला पेट, १४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT