Mumbai Mega Block Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, कुठे आणि कधी? प्रवास करण्याआधी वाचा वेळापत्रक

Mumbai Local Train Updates : रविवारी २३ फेब्रुवारी रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. दोन्ही मार्गांवरील रेल्वेच्या वेळापत्रकात काय बदल असणार आहेत? वाचा सविस्तर..

Yash Shirke

Mega Block : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक २३.०२.२०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. दरम्यानच्या काळात ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद उपनगरी गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील.

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.२५ पासून सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत बंद राहतील आणि

ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणारी डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत बंद राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT