Mumbai Local Train Saam Digital
मुंबई/पुणे

VIDEO: गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे लाजिरवाणं, लोकलच्या गर्दीवरून हायकोर्टाने रेल्वेला फटकारलं; पाहा VIDEO

Mumbai High Court On Mumbai Local: लोकलच्या वाढत्या प्रवासी संख्येवर मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी 'गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे लाजिरवाणं आहे.', असे म्हणत हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला फटकारले आहे.

Priya More

मुंबईची लाइफलाइन (Mumbai Lifeline) म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) सध्या गर्दीमुळे नेहमीच चर्चेत असते. मुंबई लोकल प्रवासादरम्यान वाढती गर्दी आणि अनेक कारणांमुळे प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांच्या मृत्यू होण्यावर आता मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) कडक भूमिका घेतली आहे. वाढत्या प्रवासी संख्येवर हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी 'गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे लाजिरवाणं आहे.', असे म्हणत हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला फटकारले आहे.

न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने बुधवारी सुनावणीदरम्यान रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. मुंबई लोकलच्या गर्दीवरून हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला झापलं आहे. 'गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे लाजिरवाणं आहे. दर दिवशी सरासरी ६ जणांचा मृत्यू होतो तरीही रेल्वे प्रशासनाला गांभीर्य नाही. प्रवाशांच्या वाहतुकीबद्दल पाठ थोपटवून घेऊ नका. सबबी देऊ नका तर तोडगा समोर ठेवा.', असे म्हणत हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला फटकारले आहे. यावेळी हायकोर्टाने रेल्वे प्रशासावर ताशेरे देखील ओढले आहे.

मुंबईत लोकल प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशामध्ये जर लोकलला उशिर झाला तर प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे अनेक जण लोकलच्या दारामध्ये उभे राहून किंवा बाहेर लटकत प्रवास करतात. दरररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये ६ प्रवाशांचा मृत्यू होतो. पण रेल्वे प्रशासनाला याचे गांभीर्य नाही असे म्हणत हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला खडेबोल सुनावले. तसंच, मुंबई लोकलच्या दुरावस्थेसाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल., असा इशारा हायकोर्टाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

SCROLL FOR NEXT