Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News: पश्चिम रेल्वे मार्गावर १२ तासांचा ब्लॉक, एका क्लिकवर वाचा वेळापत्रक

Western Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १६ नोव्हेंबरच्या रात्री ११:३० वाजता सुरू होऊन १७ नोव्हेंबरला सकाळी ११:३० वाजता संपेल.

Priya More

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान पूल क्रमांक ४६ चे पुनर्निर्माण करण्यासाठी १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हा ब्लॉक १६ नोव्हेंबरच्या रात्री ११:३० वाजता सुरू होऊन १७ नोव्हेंबरला सकाळी ११:३० वाजता संपेल. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच रेल्वे प्रवास करणे फायदेशीर राहिल.

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अंधेरी आणि गोरेगाव तसंच बोरिवली दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या लोकल राम मंदिर रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत. मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल या ब्लॉक कालावधीत फक्त अंधेरीपर्यंतच धावतील.

काही चर्चगेट ते गोरेगाव आणि बोरिवली दरम्यानच्या धीम्या लोकल थोड्या वेळासाठी रद्द करून त्या अंधेरीहून पूर्ववत केल्या जातील. तसंच ब्लॉक काळात मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना १० ते २० मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या या नियोजित ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करण्यात आला असून प्रवाशांनी या बदलानुसार आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT