Sunday Megablock saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मुंबईत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, कुठे आणि कसा असेल ब्लॉक जाणून घ्या

Sunday Megablock : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक असणार आहे. शहरातील तिन्ही रेल्वे मार्गावर आठवड्यात एक दिवस ब्लॉक घेण्यात येतो. पायाभूत सुविधांची दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.

Bharat Jadhav

Mumbai Local Megablock Sunday:

रविवारी कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रवासाचा प्लान करण्याआधी मुंबईतील लोकल रेल्वेचं वेळापत्रक तपासून घ्या. उद्या रविवारी मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Latest News)

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल ब्लॉक

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३० ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.

सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालू राहणार आहेत.

हार्बर मार्गावरील प्रवाशी ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT