Mumbai Local Mega Block on Sunday Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block Today: रविवारी म्हणजे उद्या (९ जुलै) रेल्वे विभागाकडून लोकलच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Mega Block 9 July 2023: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आहे. येत्या रविवारी म्हणजे उद्या (९ जुलै) रेल्वे विभागाकडून लोकलच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं लोकल २० मिनिटे उशिरानं धावतील.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Local Train) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे पाचवी-सहावी मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

तर शनिवार-रविवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या माहीम ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक (Megablock) नसणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा शनिवारी किंवा रविवारी घराबाहेर पडत असाल, तर रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणं गरजेचं आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे अप आणि डाऊन पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वे मेगाब्लॉक

रविवारी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप-डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (Harbour Line) शनिवार-रविवार रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे येथे थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT