Mumbai Local Mega Block saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: आज रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधी या वेळापत्रकावरून नजर टाका

Mega Block Mumbai Local: रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभालीसाठी आज (रविवार ३० एप्रिल) रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभालीसाठी आज (रविवार ३० एप्रिल) रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मात्र सदर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकांवरच थांबणार आहेत.

हार्बर मार्ग सकाळी ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी जणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील गाड्या गाड्या बंद असणार आहेत. (Mumbai Local)

पश्चिम रेल्वेही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते जोगेश्वरी दरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत पर्यंत ब्लॉक असणार आहे. (Latest Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT