Mumbai Local Accident Mumbra diva station Saam TV News
मुंबई/पुणे

Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू

Kasara CSMT Local Accident Update : मुंबईच्या कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेन अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रा-दिवा दरम्यान दोन लोकल एकमेकांना घासल्यामुळे दारात लटकलेले प्रवासी खाली पडले.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Accident Mumbra diva station : आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या मुंबईकरांवर काळाने घाला घातला. कसाऱ्याहून सीएसएमटी लोकल आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे निघालेल्या लोकलचा दिवा-मुंब्रा स्थनकादरम्यान अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. लोकलच्या दारात उभे असणारे प्रवासी खाली पडले, त्यामुळे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये तीन महिला आणि तीन पुरूषांचा मृत्यू झाला आहे.

लोकलच्या दारात लटकत उभं असणारे प्रवासी खाली पडले. दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने, दारात उभे असलेले प्रवासी रूळावर पडले अन् जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तर ८ त १० जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कसारा सीएसएमटी लोकलमधून दररोज शेकडो प्रवासी कामावर जात असतात, त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे मोठी गर्दी होती. मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल एकमेंकाना घासल्या गेल्या, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली, त्यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. लोकल जवळून गेल्यामुळे दारात लटकत उभे असणारे प्रवाशी एकमेकांना घासले गेले अन् त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते प्रवाशी रूळावर पडले. दोन्ही लोकलच्या दारात उभे असणारे १० ते १२ प्रवाशी रेल्वे रूळावर पडले. काही जणांची पाट सोलली गेली होती. डोक्याला जबर मार लागला. रूळावर जिकडे तिकडे मृतदेह अन् रक्तच होते.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेकडून सर्व मदत करण्यात आली आहे. रेल्वेकडून तात्काळ रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. दोन्ही लोकलच्या फूटबोर्डवर प्रवासी उभे होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडे नऊ वाजता मुंब्रा-दिवा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. मुंबईकडून कल्याणकडे निघालेली लोकल आणि कसाराहून सीएसएमटीकडे लोकल या एकमेकांना घासल्या गेल्या. सकाळच्या गजबजलेल्या वेळी लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये सुरू होत असल्याने प्रवाशांची संख्या जास्त होती. अनेक प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते, दोन्ही लोकल जोरात घासल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, ही घटना रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये दरवर्षी सुमारे २,५०० ते ३,००० मृत्यू होतात, ज्यापैकी बहुतांश मृत्यू हे ट्रेनमधून पडणे किंवा रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT